नात शरीफ
सप्टेंबर १९८७ मध्ये पुण्यात उर्दूचे मोठे अभ्यासक व शैलीदार स्तंभलेखक-पत्रकार, शिक्षक, समीक्षक ज़ोए अन्सारी आले होते. (ज़ोए अन्सारी हे मुंबई विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचे प्रमुख. अन्सारी तेव्हा महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे उपाध्यक्ष होते. मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.) अन्सारींच्या पुणेभेटीचे निमित्त साधून कवयित्री संगीता जोशी ह्यांच्या घरी एक अनौपचारिक बैठक झाली होती.
नात शरीफ़ सुरेश भट ह्यांच्या हस्ताक्षरात
ज़ोए अन्सारी ह्यांनी ह्याप्रसंगी जवळपास पाऊण तासांचे एक भाषण दिले होते. ह्याप्रसंगी कविवर्य सुरेश भटांशिवाय सुरेशचंद्र नाडकर्णी, इलाही जमादार, प्रदीप निफाडकर, राजेंद्र शहा हे मराठी गझलकार उपस्थित होते. उर्दू कवींपैकी दस्तगीर शिहाब, हनीफ़ साग़र, ज़ाहिद कमाल, नज़ीर फतेहपुरी व ५-६ उर्दू कवींनी ह्या मैफलीत आपले हजेरी लावली होती. ह्या मैफलीत कविवर्य सुरेश भट ह्यांनी त्यांच्या प्रसिद्ध नात शरीफचे काही शेर सादर केले होते. त्याचे हे ध्वनिमुद्रण. (सौजन्य: राजेंद्र जोशी)