नाही बरे.. (हझल)

===================
हे  तुझे  माझ्यावरी  रागावणे  नाही  बरे,
दूर  माझ्यापासुनी  ते  धावणे  नाही  बरे..


मी  तुझ्यासाठी  फुलांची  माळ आहे  गुंफली
दागिन्यांची  रास  तुजला  भावणे  नाही  बरे..


रोज "माझे प्रेम आहे," हे किती  समजावतो?
रोजचे  माझे  असे समजावणे  नाही  बरे..


मी  कधी  रात्रीस  आलो  एकटा  दारी  तुझ्या,
श्वान माझ्या  पावलाला  चावणे  नाही  बरे..


हाय! मी  देणार होतो  मोकळे  आकाश हे...
तू दुज्याच्या  फ्लॅटमध्ये  मावणे  नाही  बरे !


=====================


(हझल असावी  अशी  शंका आहे.)

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

शेवटचे दोन शेर हझलच्या पात्रतेचे आहेतच. आधीचे गझलसारखे वाटतात. काही म्हणा, मजा आली.

प्रिय मित्र ज्ञानेश,
ही गझल किंवा हझल तू का केलीस हे मला समजत नाही. माझ्यामते हझलमधून विनोद निर्माण होणे किंवा एखादा संदेश जाणे आवश्यक आहे. हझल हे सदर सुरू असावे म्हणुन त्यात काहीही लिहिणे म्हणजे राजकीय नेत्यांनी आपल्या विभागातील युवकांना उंडारण्याची संधी मिळावी यासाठी मुद्दाम पक्षाचा 'युवक विभाग' उघडण्या...असो मी गप्प आहे.