(गझल)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची गझल

टार नाही, टूर नाही
वास हा पण दूर नाही

चौर्य केले, काव्य नाही
मी तरी मशहूर नाही

विरह भेटावा जरा मज
हे तिला मंजूर नाही

टाकली दुःखात थोडी
येवढा मी शूर नाही 

आरसा पाहू नको तू
भूत दिसते, हूर नाही

बघ जरा माझ्या कडे तू
तोंड माझे ऊर नाही

"केशवा" ही झूल कसली?
आज पण बेंदूर नाही

केशवसुमार.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मी तर हसलो बुवा!!!