शक्य नाही

मी कधी म्हणणे "मला हे  शक्य नाही"
शक्य नाही शक्य नाही शक्य नाही


मोह ना पडणे मला या जीवनाचा
हे तुझ्या भोळ्या अदांना शक्य नाही


ईश्वरा डरतोस कसला, आहे मी
जर तुला अवतार घेणे शक्य नाही


शरम सोडुन बोलणे का शक्य नाही?
ती म्हणे "ना जाणते पण शक्य नाही"


कृत्य आठवली की मी ही मानतो
'काल' जैसा 'आज' होणे शक्य नाही


माझिया नशिबातही ये ना जरा तू
संधिसाधू नशिब म्हणते "शक्य नाही"



 



 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

अशक्य  लिहिता कटककर.  खरेच अशक्य आहे.

श्री परखड व श्री यादगार,
कृपया मोठ्या मनाने दोष सांगा. सुधारण्याचा वाव मिळेल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बाळ भूषण,
गझलेतला तुझा काफिया कुठे आहे ? काय वृत्त आहे इथे ? दाखव बघू मला.
"शक्य नाही" याला काफिया मानणं शक्य नाही

तुझी ही गझल बघून :-
-जीभ टाळूला चिकटलेले तुझे आजोबा
-पाचावर धारण बसलेले तुझे आजोबा
-दरदरून घाम फुटलेले तुझे आजोबा
-तोंडाचं पाणी पळालेले तुझे आजोबा
-घाबरगुंडी उडालेले तुझे आजोबा
-गलितगात्र झालेले तुझे आजोबा
-बोबडी वळ्लेले तुझे आजोबा
-घाबरलेले तुझे आजोबा
-भ्यायलेले तुझे आजोबा