सराईत

वार केला तेव्हा गीत गात होता
घाव घालणारा सराईत होता

कळालेच नाही कधी फ़ास झाला
माझ्या गळ्यातला जो ताईत होता

जन्मभर फुले मी वेचली ज्यासाठी
तोच काटा मला ओरबाडीत होता

किती धावलो मी हाती काहीच नाही
मृगजळ बनुन तो मला भुलवीत होता

हरेक स्वप्न माझे होते समर्पित त्याला
हरेक स्वप्न माझे तो तुडवीत होता

किती फुलासारखी प्रतिक्षा मी केली
कसा पाचोळा माझा तो उडवीत होता

रितेश भोईटे

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

गझलेचे नियम, व्याकरण आत्मसात करून तंत्रशुद्ध गझल लिहावी, ही विनंती. ही रचना तंत्रशुद्ध गझल नसल्याने विचाराधीन ह्या विभागात सावकाश हलविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी.

--विश्वस्त