जातांना नको बोलूस हळ्वे
जातांना नको बोलूस हळ्वे
शब्द नको शोधूस हळ्वे.
वळनार नाही जीभ माझी
प्रश्न नको करुस हळ्वे.
नेतील तुला दुखाच्या दारी
माग नको शोधूस हळ्वे.
फुटेल ह्या तनामनास टाहो
स्पर्श नको करुस हळ्वे.
आधीच डोळे डबडबलेले
वळूनी नको पाहूस ह्ळ्वे
------ किरण
Taxonomy upgrade extras: