नभी चान्दण्यांची जरी आरास आहे
नभी चान्दण्यांची जरी आरास आहे
अंधार कोठडीचा मज कारावास आहे.
तू उधळ तुझ्या चंद्रकला आकाशी
मज लागले ग्रहण खग्रास आहे.
कुन्या सैताना ने मुडदे पाडले
अन साधुच्या गळ्यात फास आहे.
अशी सुरू आहे वाटचाल जीवनाची
जनू मरना नंतरचा प्रवास आहे.
ना पायात फास ना पिंजर्यास ताला
किती पारध्याचा पक्ष्यावर विश्वास आहे.
मज आरश्या समोर आल्यावर कळले
अस्तित्व माझे आभास आहे.
कुणीही न शेजारच्या कुशीवर माझ्या
मात्र येतो मोगर्याचा सुवास आहे.
-----किरण<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>
Taxonomy upgrade extras: