मैफिल
नि:शब्द स्तब्ध सृष्टि
निश्प्राण गार वारा
डोहामध्ये तमाच्या
व्याकूळसा इशारा
पटलावरी नभाच्या
हे मोजकेच तारे
लावून प्राचिला डोळे
आशेचे मृतक धुमारे
प्राक्तनास माझिया या
हा छंद अघोरी जडला
संदिग्ध क्षितिजावरति
एक तारा अवचित गळ्ला
या अवघड वळणावरती
वळवाची सर कोसळते
ही आज अवेळी कोकिळ
कां मालकंस आळविते
मी दोष कुणाला देऊ
रस्तेच फितुरी होते
कां रोज पापण्यांमागे
स्वपनांची मैफिल भरते
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
विश्वस्त
बुध, 02/04/2008 - 14:43
Permalink
ही रचना गझल नाही
प्रसाद, ही रचना गझल नाही. विचाराधीन ह्या विभागात तंत्रशुद्ध नसलेल्या रचना
सावकाश हलविण्यात येतात, ह्याची कृपया नोंद घ्यावी.