निश्चय
मंद वारा कधी इथे वळलाच नाही
दीप आशेचा कधीही जळलाच नाही
घेतले ते चुंबन की होता एक चावा
तो आजही कावा तुझा कळलाच नाही
सिद्ध झालो उपदेशाला येथ भूवरी
कोणी एक लाल आज चळलाच नाही
रूक्ष होते जीवन, दाह वैशाखापरी
पापणीतुन अश्रुही गळलाच नाही
नित्य आशा जयाची नेई क्षितीजावरी
पराजय माझा कधी टळलाच नाही
कोंब फुटतो हर साल वसंतात जो
पुढे जाऊन कधी तो फळलाच नाही
जाण मातीच्या सलगीची दाखवू कशी
एकही कपडा कसा मळलाच नाही
नित्य होत्या वेदना येत सुनामीपरी
निश्चय माझा कधी तो ढळलाच नाही
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
विश्वस्त
सोम, 31/03/2008 - 12:26
Permalink
ही रचना
ही रचना तंत्रशुद्ध गझल नसल्याने विचाराधीन ह्या विभागात सावकाश हलविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी.