मी.. माझ्यातला...
देतात दगा हे शब्द नेहमी मला
ना सांगू शकलो कधि काहिच मी मला
बोलु काय माझ्याबद्दल येथे मी
ना कधी पाहिले आरशात मी मला
तुला पाहुनी तोल सुटे जगताचा
कसा आवरू सांग इथे मी मला
होतो मीही गर्दीत उभा त्या वेळी
ना ओळखले पण त्या क्षणीच मी मला
नाही केले बंड मीच का तेव्हा?
इथे घालतो शिव्या आज मी मला
जेव्हा होती खरी गरज मज त्याची,
गेला फसवुन माझ्यातिल 'मी' मला
आयुष्य जरी ना कधी सुलभ हे झाले,
पारखले केवळ त्यामुळेच मी मला
भरणार पोहरा पुन्हा रिक्त झालेला,
देतसे दिलासा हाच आज मी मला
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
विश्वस्त
सोम, 31/03/2008 - 12:30
Permalink
आज,
आज, त्यामुळेच अशी स्वरयमके चालत नाही.
स्वरयमकांची गझल टाळावी, असे माझे मत आहे.रचना तंत्रशुद्ध गझल नसल्याने विचाराधीन ह्या विभागात सावकाश हलविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी.