शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी
शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी
लेखणीस येते तरीही खाज ती जराशी
नजरेत दोष आहे या धुंद षोडषांच्या
चालीत दोष आहे बेबंद षोडषांच्या
कपड्यास आज आली व्हॅल्यु कमर्शीयल
रस्त्यात प्रदर्शिती त्या नाजुक पार्टीकल
व्यक्ती विकास व्हाया कपड्यास अर्थ नाही
तोकडे तरीही अगदीच व्यर्थ नाही
दिसतेच ते जगाला झाकुन जे हवे
फुकटात देत सुटती दृष्टीस जे नवे
कृष्णास द्रौपदीच्या आल्या कळुन हाका
द्युतात नग्न केले तुम्हांस ते कुणी का
कपडे असेच घाला जे रोखतील घाला
नजरेस ऊत आला मी सांगतो तुम्हाला
Taxonomy upgrade extras: