गझल

निमिष्यही आत युगासम भासतो आहे
माझाच एका॑त आता माझ्यावर हासतो आहे.

कोणती जादू अशी केलिस तू ...?
स्वप्ना॑चा एक गाव मनात वसतो आहे.

सगळेच सोबतिला आसुनही येथे...
वस॑तातही तुझ्याविना शिषिर भासतो आहे.

तू तिथे मुग्ध अबोध अन् अजान इतकी...
मी इथे आठवा॑च्या ज्वाळास सोसतो आहे.

आनुभवले आजवर काजव्यास जरी मी...
तो पहा च॑द्र माझा ढगाआड दिसतो आहे.

का असा झालास 'माधवा' तू दिवाणा कोणासाठी ?
वार करणारा तुझ्यावर चेहरा तो हासतो आहे.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

कल्पना चांगल्या आहेत. आपणांस रदीफ काफियाचीही बर्‍यापैकी कल्पना आलेली दिसते, ही चांगली गोष्ट आहे. पण रचना वृत्तात नाही. 
वृत्ताचा अभ्यास करण्याची गरज आहे. गझल लिहिताना घाई करू नये. लघू-गुरू समजून घ्यावे. बाराखडी पुन्हा पुन्हा वाचावी. ही गझल तंत्रशुद्ध झाली की गझल विभागात नेण्यात येईल.  तोपर्यंत गझलेवर अजून काम करावे.