'गझलदीप'ची दुसरी आवृत्ती लवकरच
मराठीतले बिनीचे गझलकार प्रदीप निफाडकर ह्यांच्या गझलदीप ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होते आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशक पारस पब्लिकेशन्स ह्यांनी कळविल्यानुसार, ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती सहा महिन्यांतच हातोहात खपली आणि हा अशा प्रकारच्या मराठी पुस्तकांच्या बाबतीत एक विक्रम आहे.
- गझल या काव्यप्रकाराबद्दल सर्व माहिती देणारा मौलिक ग्रंथ.
- गझल व कविता यातील नेमका फरक उलगडून दाखविणारा, गझलेच्या जगभरातल्या शब्दकोशातल्या व्याख्या सांगणारा, गझल बद्दलचे गैरसमज दूर करणारा हा ठेवा.
- सोबत प्रदीप निफाडकर यांच्या काही निवडक गझलांचा नजराणा.
- चित्रपटातील गझल, गझलगायन अशा सर्व बाजूंनी वेध घेण्याचा मराठी भाषेतील पहिला प्रयत्न.
- रुबाईच्या सर्व वृत्तांची खास भेट आणि मराठी वाङ्मयात कधीच ज्याचे दर्शन झाले नाही अशा उर्दू कवयित्रींचा रसपूर्ण परिचय.
पारस पब्लिकेशन्स, बी-१/२, हिंदू कॉलनी, केव्हिस पार्कजवळ, नागाळा पार्क
कोल्हापूर. दूरध्वनी: ०२३१-६५२१७४४, भ्रमणध्वनी: ९८५०३८४२३२
ई-मेल: paraspublications@rediffmail.com
मूल्य: १६० रूपये.