मी

चितेतही न जळलो मीचिंतेत तुझ्या,असा जळलो मीनिखारेही कधी ना पोळले शब्दांनी तुझ्या,असा होरपळलो मीबुडालो दुःखात माझ्याच असा माझाच मला, कधी न कळलो मीपाहून लागली हळद तुलाहाय रे दैवा,नुसताच हळहळलो मीऋतू आले नी गेले ना फुललो कधीआलीस तू ,नुसत्या जाणिवेने सळसळलो मीजुमानले ना संकटांनाही कधीनसण्याने पण तुझ्या,लक्षापासून ढळलो मीमारल्या हाका त्यांनी कितीहीप्रेत्येकवेळी,असशिल तू म्हणूनी वळलो मीचिवट असा की लवकर ना पेटलोचितेतही,नुसताच धुराने मळलो मीशिवलो ना पिंडास मीच माझ्यायेशील आता तरी,वेळ किती घुटमळलो मीजराही तुझी वाट न पाहीली त्यांनीकेला दर्भाचा कावळा,पाहून कळवळलो मी

Taxonomy upgrade extras: