मी

निखारे ही ना कधी पोळले मला
असा शब्दांनी तुझ्या पोळलो मी

चितेनेही न जाळले मला
चिंतेत तुझ्या असा जळालो मी

बुडालो दुःखात माझ्याच असा की
माझाच मला न कधी कळालो मी

ऋतू आले नी गेले फुललो ना कधी
आलीस तू नुसत्या जाणिवेने सळाळलो मी

संकटांनाही जुमानले ना कधी
नसण्याने तुझ्या,जिवनापासून पळालो मी

मारल्या हाका त्यांनी कितीही
प्रेत्येकवेळी असशिल तू म्हणूनी वळालो मी

चिवट असा की लवकर ना पेटलो
चितेतही नुसताच धुराने मळालो मी

शिवलो ना पिंडास मीच माझ्या
येशील आता तरी वेळ किती घोटाळलो मी

जराही तुझी वाट न पाहीली त्यांनी
दर्भाचा केला कावळा पाहून कळाळलो मी



Taxonomy upgrade extras: