लगान एकदा तरी..... (हझल?)

लगान एकदा तरी..... (हझल?)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

गंगाधर मुटे
.........................................

गझल: 

प्रतिसाद

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

:) विरत्वश्री हा नवा प्रयोगही दिसतो आहे:):)

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

:):) एक घर बनाउँगा तेरे घर के सामने? :):)

:)

गझलेतील मिश्कीलता आणि प्रतिसादातील मिश्कीलता हे दोन्ही आवडले.

विरत्वश्री या शब्दाला पर्याय शोधायला लागेल.

एक घर बनाउँगा तेरे घर के सामने?

नाही चित्तजी,
घरासमोर घर बांधण्याची कल्पना कालबाह्य आणि उपयोगशून्य आहे.
म्हणजे असे समजा की,
'ती' बालगंधर्व सभागृहाच्या शेजारी राहते. तर तिथे मी घरासमोर घर बांधायचे म्हटले तर तेवढी रक्कम उभी करायला मला माझा अख्खा गांव विकावा लागेल.
'ती' मुंबईच्या मलबार हिलवर राहत असेल तर तिथे मी घरासमोर घर बांधायचे म्हटले तर तेवढी रक्कम उभी करायला मला माझा अख्खा तालूका विकावा लागेल.
त्यामुळे मी स्वप्नातही "एक घर बनाउँगा तेरे घर के सामने?" असे म्हणण्याचे धाडस करू शकत नाही. :)

मी फक्त " तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी" असे म्हणू शकतो.
अर्थात 'ती' एखाद्या झोपडपट्टीत किंवा अतिक्रमण करून मकान बांधता येईल, अशा एरीयात आली की.
तिथेच मकान बांधायला मोकळे :)

मस्त.
गंगाधरजी,
प्रतिक्रियेने काळजाला घरे पडली.
ही घरघर घेऊन पुन्हा तेरे घर के सामने,
गाव विकायची काही गरज नाही, 'तुझ्यासमोर' बांधायचे आहे ना मग
तिला ऊभी करायची रस्त्यावर मग समोर खारघर आहेच की.

नाही चित्तजी,
घरासमोर घर बांधण्याची कल्पना कालबाह्य आणि उपयोगशून्य आहे.
म्हणजे असे समजा की,
'ती' बालगंधर्व सभागृहाच्या शेजारी राहते. तर तिथे मी घरासमोर घर बांधायचे म्हटले तर तेवढी रक्कम उभी करायला मला माझा अख्खा गांव विकावा लागेल.
'ती' मुंबईच्या मलबार हिलवर राहत असेल तर तिथे मी घरासमोर घर बांधायचे म्हटले तर तेवढी रक्कम उभी करायला मला माझा अख्खा तालूका विकावा लागेल.
त्यामुळे मी स्वप्नातही "एक घर बनाउँगा तेरे घर के सामने?" असे म्हणण्याचे धाडस करू शकत नाही. :)

मी फक्त " तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी" असे म्हणू शकतो.
अर्थात 'ती' एखाद्या झोपडपट्टीत किंवा अतिक्रमण करून मकान बांधता येईल, अशा एरीयात आली की.
तिथेच मकान बांधायला मोकळे :)

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा !

बाय द वे! एवढे सगळे प्रॉब्लेम्स असतील तर तिच्याचसमोर कशाला मकान बांधायला हवे?

इतर अनेक मिळतील की?

-'बेफिकीर'!