सारं दु:ख सोसलं
सुखावल्यासारखं हसत हसत सारं दु:ख सोसलं
दु:खावणार्या बांडगुळांना मित्रांसारखं पोसलं ||१||
आपलं म्हणुन मायेने ज्यांना जवळ केलं
माया विसरुन सारी त्यांनी सापासारखं डसलं ||२||
निसरड्या अरुंद वाटांवरुन तोल सावरत गेलो
राजरस्त्यावर नशीब मात्र बावळ्यासारखं फसलं ||३||
वखवखत्या भुकेला त्यांच्या पोटभरुन दिलं
अतृप्त त्यांच्या भुकेने अधाशासारखं तोंड वासलं ||४||
दु:खात घडोघडी होती त्यांना माझी साथ
माझ्या वेदनेला सुख त्यांचं द्रुष्टासारखं हसलं ||५||
कवी:- श्रीराम समर्थ
निमित्त:- महेश अवसरे
Taxonomy upgrade extras: