सांगू कसे...?(गझल)
सांगू कसे तुला मी जे अंतरात आहे
वेड्या तुझ्याचसाठी मी बंधनात आहे
देवू नये कुणाला आधार कुंपणाचा
घ्यावे टिपून सारे जे अंगणात आहे
व्याकूळ काळजाचे ते लोळ पाहताना
का वाटते असे की मी चंदनात आहे
त्या ईश्वरास ठावे तो भाव आंधळ्याचा
जोडून हात गेला जो वंदनात आहे
ही बासरी जिवाची भेदून सूर गेले
आकांत सावरीचा या स्पंदनात आहे
ममता...
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
गुरु, 28/10/2010 - 16:41
Permalink
पहिला आणि शेवटचा आवडला..
पहिला आणि शेवटचा आवडला..