धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा..
उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे
कार्यकर्ते ठेंगणे नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे
धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
तुस कोंडा माणसाचे भक्ष आहे
देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी आतला हा कक्ष आहे
शोभते ओठी तुझ्या अस्सल शिवी पण
या तुझ्या हातात तर रुद्राक्ष आहे
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 01/09/2010 - 11:43
Permalink
चांगली हझल....
चांगली हझल....
ह बा
बुध, 01/09/2010 - 17:17
Permalink
छान रचना!!!
छान रचना!!!
चित्तरंजन भट
बुध, 01/09/2010 - 19:00
Permalink
देवघेवीचे चला बोलून
देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी आतला हा कक्ष आहे
हे आवडले ;)