पळवाट






पळवाट
कौतुकाचा पाट शोधू
जरा काही भाट शोधू

रात्र थोडी सोंगे फार
त्या करता पहाट शोधू

गाडग्याने काय होइल?
त्याला छान रहाट शोधू


गंगेचेच स्वप्न धरुनी
मिसिसिपीचा घाट शोधू

ये भरती अमावस्येला
अशी वेगळी लाट शोधू


ठकाला मिळतो महाठक
असा दिल्लीहाट शोधू


 


 






Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

मात्रावृत्ताची अपेक्षा इतकीच नाही की प्रत्येक ओळीत सारख्या मात्रा हव्यात.  

शाबास! रुळलेल्या पायवाटा मोडून जाणारी नवी गझल.
कौतुकाचा पाट शोधू
जरा काही भाट शोधू - उत्तम!
काही -
ये भरती अमावस्येला
ठकाला मिळतो महाठक
अशा ओळी सिंहावलोकन करण्यास पात्र आहेत.