सस्नेह आमंत्रण - गझल सहयोगचा मुशायरा - हे गाव आपल्यांचे

सस्नेह आमंत्रण

बेफ़िकीर, अजय जोशी व डॊ.अनंत ढवळे सादर करत आहेत..

गझल सहयोगचा चवथा द्विमासिक मराठी गझल मुशायरा

हे गाव आपल्यांचे

वेळ - सायंकाळी ५.४५ ते सायंकाळी ७.४५
वार - रविवार
दिनांक - १३ जून, २०१०
स्थळ - धन्वंतरी सभागृह, पटवर्धन भाग, पुणे ४११००४

सहभागी गझलकार:

भूषण कटककर (बेफ़िकीर)
श्री. अजय जोशी
श्री. नचिकेत जोशी (आनंदयात्री)
सौ. प्रभा सोनवणे
श्री. मिलिंद छत्रे (मिल्या)
श्री. घनश्याम धेंडे
डॊ. अनंत ढवळे

रूपरेषा:

कवींचे व्यासपीठावर आगमन - ३ मिनिटे
भटसाहेबांच्या दोन गझलांचे सादरीकरण - पाच मिनिटे
चक्री मुशायरा - ९० ते ११० मिनिटे
कार्यक्रम समाप्ती व आभार - दोन मिनिटे

गझल सहयोगचे मुशायरे अनौपचारिक असून त्यात कोणतेही भाषण, सत्कार समारंभ, आभार प्रदर्शन या स्वरुपाची औपचारिकता नसते. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.

यावेळेस सूत्रसंचालन अजय जोशी करणार आहेत. श्री. अजय जोशी ऒगस्ट व सप्टेंबर महिन्यात परदेशी जाणार असल्यामुळे त्या दोन महिन्यातील मुशायरा या महिन्यात (जून २०१०) घेण्यात येत असून नेहमीप्रमाणे जुलैमधे असलेला द्विमासिक मुशायरा जुलै महिन्यात होईलच! आम्ही ज्या इतर कवींशी गेल्या महिन्याभरात सहभागाबाबत बोललेलो आहोत त्यांचा समावेश जुलै महिन्यात असावा असा आमचा मानस आहे याची कृपया नोंद घ्यावी.

यावेळेस सभागृह बदललेले आहे याचीही कृपया नोंद घ्यावी. पटवर्धन बाग ही महादेव मंदिर चौक ते गणेशनगर या रस्त्यावर असून या रस्त्यावरून पटवर्धन बागेत आत आल्यानंतर साधारण दोनशे मीटरवर डावीकडे हे सभागृह असून रस्त्यावर पार्किंगची सोय व्यवस्थित आहे.

सर्वांना मनापासून सस्नेह आमंत्रण!

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

मुशायर्‍याचे नाव आवडले.

हे गाव आपल्यांचे.

शुभेच्छा!

मागचा मुशायरा इतका सुरेख झाला की आता कुठला चुकवावासा वाटतच नाही.
आपल्या नित्यपरिचयाच्या अजय्,भूषण्,अनंत ढवळे ,मिल्या,आनंदयात्री यांजखेरिज माझ्यासाठी मुख्य आकर्षण घन्श्याम धेंडे आणि प्रभा सोनवणे असणार आहे.
मुशायर्‍यास खूप शुभेच्छा....

मी माझ्यासह ४/५ रसिकांसह हजर असेन.

डॉ.कैलास