कळते रे!

कळते मज सारे कळते रे!
मन माझे तरीही चळते रे!

राखत आले सखया अजवर
विचारले नसण्याचे अंतर
शब्द तुला भेटतील नंतर
आयुष्य न मागे वळते रे!

कळते मज तू अवख़ळ वारा
कळते मज तू रिमझिम धारा
...कधी दूरचा पहाटवारा
तव रूप कसेही छळते रे!

कळते रे हे तुझेच अंगण
जिथे फुलांची नाजुक पखरण
थकले रे, आले तरीही पण
का दार तुझे अडखळते रे!


--

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: