माझाच व्हावा मला नित्य आधार

कोठे मिळावा प्रकाशात शेजार
कोठे उरावा मनाचाच अंधार

का जात नाही अता सूर्य अस्तांस ?
मोजून केला कुठे आज शृंगार...

राजा निघाला गुन्हे संपवायास...
त्याचे गुन्हे मोजण्या कोण येणार ?

माझे, मनाशी तुझ्या, मागणे हेच ..
माझाच व्हावा मला नित्य आधार

ती जायची रोज अर्ध्याच भेटीत
अन् त्यातही तीच घालायची वार

सांगून गेले खुणा काळजातील
ठोठावलेले तिचे बंदसे दार

तू कोण लागून गेलीस राणी..., कि -
सारे तुझ्या फायद्याचेच होणार..?

त्यांना कुठे माहिती कोण माणूस ?
ते गोडवे माकडाचेच गाणार....

होते जरी ताकदीचे किती मल्ल...
रामास होती तरी पाहिजे खार...!

प्रतिसाद

होते जरी ताकदीचे किती मल्ल...
रामास होती तरी पाहिजे खार...!

सुंदर गझल.
२,३,५,७ आवडलेत.

धन्यवाद गंगाधर मुटे.

त्यांना कुठे माहिती कोण माणूस ?
ते गोडवे माकडाचेच गाणार....

होते जरी ताकदीचे किती मल्ल...
रामास होती तरी पाहिजे खार...!

शेर आवडले...!
शुभेच्छा...!

आवडलेला शेर :
होते जरी ताकदीचे किती मल्ल...
रामास होती तरी पाहिजे खार...!

कोठे मिळावा प्रकाशात शेजार
धाडशी कल्पना.

प्रकाश, अंधार, सुर्य, अस्त्, अर्ध्य, ...छान.

प्रतिसाद दिलेल्या - न दिलेल्या सर्व वाचकांचे आभार!
लोभ नसावा, मैत्री असावी.
धन्यवाद!

लय सापडत नाही आहे.

तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. एखादी रचना तंत्रशुद्ध नसूनही विचाराधीन/अप्रकाशित झाली नसल्यास सदस्यांनी विश्वस्तांना कळवावे किंवा प्रतिसादातून लिहावे, ही सगळ्यांना विनंती.

गागाल गागाल गागाल गागाल

अशी पूर्णपणे तंत्रशुद्ध रचना असूनही विश्वस्तांना का लय सापडत नाही आहे. तंत्रशुद्ध रचनेला विचाराधीन विभागात हलवून विश्वस्तांनी योग्य केले नाही.