शुभेच्छा, अभिनंदन इत्यादी

शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी असलेले पान. प्रतिसादातून शुभेच्छा द्याव्या, अभिनंदन करावे.

प्रतिसाद

गझलगायनातिल एक अर्ध्वयू भीमराव पांचाळे यांचा आज वाढदिवस असल्याचे समजले...( वाशी येथिल एक ज्येष्ठ गझलकार...व माझे प्रेरणास्थान '' विनायक त्रिभुवनयांजकडून )

त्यांना मजकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ.कैलास गायकवाड

भीमराव पांचाळे यांना मजकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

भीमराव पांचाळे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!!

अध्वर्यू म्हणजे काय?

आत्ताच मी त्यांना फोन करून 'गझल गायनातील अध्वर्यू' म्हणजे काय हे 'शुभेच्छा दिल्यानंतर' विचारले त्यावर ते 'काय माहिती' असे म्हणाले. पण मी शुभेच्छा मात्र दिल्या.

अर्ध्वयू म्हणजे सर्वोच्च स्थानावर असलेल्या काही जणांपैकी एक.

डॉ.कैलास

आपल्या संकेतस्थळावरील एक लोकप्रिय गझलकार ''डॉ.ज्ञानेश पाटील'' यांच्या ''जाहला बराच वेळ'' ह्या गझलेची
आठवड्याची निवड म्हणून गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी निवड केली असून्,सकाळच्या नागपूर आवृत्तीत आज प्रसिद्ध झाली आहे.
प्रिय ज्ञानेश यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

http://72.78.249.107/Sakal/22Sep2010/Enlarge/Nagpur/page7.htm

ह्या दुव्यावर सदर गझल उपलब्ध आहे.

माझे आवडते गझलकार, जुने मित्र, अभ्यासू व शांत स्वभावाचे डॉ. ज्ञानेश पाटील यांचे मनापासून अभिनंदन! गझलकार म्हणून त्यांचे नाव अधिकाधिक पुढे येत राहो सर्वमुखी होवो अशी प्रार्थना व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

ज्ञानेश यांचे मनापासून अभिनंदन!

आभारी आहे मित्रांनो ! :)

ज्ञानेश ह्यांच्या गझलेची दखल घेतली ह्याचे अर्थातच नवल नाही. पण तरीही अभिनंदन. आणि त्यांना शुभेच्छा .

अभिनंदन ज्ञानेश!!
:)

ज्येष्ठ गझलकार श्री.श्रीकृष्ण राऊत यांना मुंबअ‍ॅ येथील बांधण जनप्रतिष्ठान तर्फे गझल लेखनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल
२०१० चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण राउत यांना ९ जानेवारी २०१० या दिवशी अमरावती येथे होणार्‍या गझलोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे.

त्याच बरोबर नवोदित गझलकाराचा पुरस्कार श्री.सिद्धार्थ भगत यांस जाहीर झाला आहे.

डॉ.श्रीकृष्ण राउत व श्री.सिद्धार्थ भगत यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

भीमरावजींना माझा सादर प्रणाम व वाढदिवसाच्या शुभेच्चा.

अनिल्,भीमरावांचा वाढदिवस ३१ मार्चला होता..... हा धागा डॉ. श्रीकृष्ण राउत यांच्या अभिनंदनास्तव वर आला आहे. :)

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवी दिल्ली येथील ग़ालिब अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'ग़ालिब पुरस्कार' यंदा औरंगाबादचे शायर बशर नवाज ह्यांना जाहीर झाला असून ३१ दिसेम्बरला तो त्याना प्रदान करण्यात येणार आहे.
बशर साहेबांचे हार्दिक अभिनंदन!!!

बशर साहेबांचे अभिनंदन.

या संकेतस्थळावरील समस्त रसिकांस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.