बाटली

म्हणाली बाटली, "तोंडास त्याच्या वास का येतो"?
सकाळी शेण खाल्ल्याचाच तो आभास का होतो?

जरा पोटात ती गेल्यावरी लाडात का येतो?
चणे, दाणे, मसाले खाउनी तो त्रास का देतो?

गुलाबी, देखण्या, भरल्या रुपावर तो फिदा होतो
जराशी बायकोची याद येता, घास का अडतो?

गटाटा ढोसतो वर पेटते का तीनदा बघतो
झळा त्या सोसते ती बाटली, शाबास, हा म्हणतो?

रिकामी बाटली, कचर्‍यात, भंगारात विकतो तो
खळाळा फोडतो मज बेवडा तो , दास का होतो?

कधी मज ना कळे, बाई, मला ती सवत का म्हणते?
उधारी ठेवतो पेदाड आणि मिजास का करतो?

गझल: 

प्रतिसाद

आपण नवीन काव्य केलेत की मी आवर्जून वाचतो,
कुणास ठाऊक लिहिता लिहिता कधी गझल कराल!

अनिलराव, फार घाई होते आहे.

अनिल,
येतो, होतो, अडतो असे तीन प्रकार चालणार नाहीत.
येतो घ्यायचे असेल तर त्याजोडीला देतो, घेतो, नेतो...इ. 'एतो' चे प्रकार वापरता येतील.
होतो (ओतो), अडतो (अतो) अशा जोड्या चालणार नाहीत.
खरे तर मुळात आपला विचार वेगळाच आहे.
आस का देतो/होतो वगैरे. म्हणजे 'आस' हा काफिया घेऊन का देतो/होतो असा रदीफ घेतला आहे. मात्र, काफियातील व्यंजन बदलता येते तसे रदीफातील काहीच बदलता येत नाही. त्यामुळे एकदा 'का येतो' असे घेतले की तेच कायम असते. यावर लक्ष द्या आणि लवकर बदल करा. म्हणजे ही हझल विचाराधीन होणार नाही.
घाईची चिंता करू नका. असे होत असते.

ऋत्विक, ज्ञानेश, स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभार.
अजयजी धन्यवाद. बदल करणे सहज शक्य आहे पण "बुंदसे गयी..."

ऋत्विकांना मी कधीतरी गझल करीन असा अद्याप विश्वास वाटतो हेच जास्त आहे.

ज्ञानेशजी आपण म्हणता ते मान्य आहे. पाया भक्कम नसताना प्रयोग करण्याची घाई होत आहे.

बाटली छान.

प्रतापजी,
धन्यवाद.

म्हणाली बाटली तोंडास त्याच्या वास का येतो... - हा हा हा हा हा हा! जबरीच कल्पना आहे.

बेफिकीरजी
एक ओळ का होइना आपल्याला थोडासा आनंद देऊन गेली. खुप बरे बाटले.
थोडासा विरंगुळा हाच तर कवितेचा उद्देश आहे.
आभारी आहे.
लोघ असावा.