----नसते आशा जीवनाची----

नसते आशा जीवनाची का फुका असे मरावे
दुःखाना वाटले पाहिजे का आम्ही असे हरावे

शांत होता सारे असेच धुळ वादळि उडावी
भोवा~यास आठवावे शांत का मी असे हरावे

सूर्य देता प्रकाश पुन्हा दिवस तो उजळला
चंद्र आला प्रकाशाचा रात्रीने का असे हरावे

मागता आले नाही म्हणुन राहिलो भिकारी आम्ही
पोट नसता भिक कसली मागुनी तरी असे हरावे

शोधताना हरवेल काही सापडे ते पुन्हा नवे
शोधण्याच्या ह्याच हेतूने शोधने का असे हरावे

नायकाची नायका मी वक्तव्य माझे कसे असावे
नायकी समोर प्रक्षकानी वाहवा करत असे हरावे

----नेहा पांडुरंग परी----

प्रतिसाद

उत्तम,

रंज राहत फजा नही होता
असर उसको जरा नही होता

या सतरा किंवा अठराक्षरी रचनेच्या आशयातील प्रामाणिकपणाबद्दल मनापासून अभिनंदन!

अवांतर - पुण्यातील साहित्य संमेलनात काही 'विचाराधीन करावेत असे कवी' कविता सादर करणार आहेत असे एका 'या स्थळाशी संबंध नसलेल्या' निकटवर्तीयाकडून समजले. मात्र या स्थळाशी संबंध असलेले माझे एक मित्र आहेत त्यांनी कविता सादर करायला आधीच नकार कळवला आहे.