आस्वाद
खांद्यावर पाय देउन तो आबाद होता,
मला गाडण्याचा हेतु तो निर्विवाद होता,
विरघळले रडु अश्रुंचा पाउस होता,
हसवण्याचा मेघांचा खोटा प्रमाद होता
थांबताना सारे पुढे मला का ढकलले,
सगळ्यांचा खुश असण्याचा उन्माद होता
एकदाच असावे निर्विघ्न ते चालणारे,
हात हाती देउन सोबतीचा नाद होता,
फूंकून चिंता धुरळ्यात दुःख उधळणारे,
घामाने शरीर माखण्याचा तिथे वाद होता
स्वर्गातुन ते नरकाचा हेवा करणारे,
मला मात्र स्वर्गात दोन्हींचा आस्वाद होता
निलेश
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
विश्वस्त
बुध, 02/05/2007 - 10:28
Permalink
प्रिय
प्रिय निलेश,
संपूर्ण गझल एका वृत्तात असावी लागते. वृत्त म्हणजे काय, ह्या गोष्टीचा आधी अभ्यास करावा. वृत्तात लिहिणे कठीण नाही. पण वृत्तात असल्याशिवाय गझल तंत्रशुद्ध म्हणता येणार नाही.
त्यामुळे काही काळानंतर आपली रचना विचाराधीन विभागात हलविण्यात येईल.
मो. रा. वाळंबे यांच्या 'शुद्धलेखन प्रदीप' ह्या पुस्तकात याबाबतीत प्राथमिक माहिती मिळू शकेल. तसेच मराठीच्या पाठ्यपुस्तकांतही ही माहिती मिळेल. ही माहिती मिळवून चांगला अभ्यास व सराव करावा.
हार्दिक शुभेच्छा!
विश्वस्त