उमेद

आता नवे जगायाच्या उमेदी आणू कशाला?
आता नवे भोगायचे शाप मी मागु कशाला?

आता नवे सोसायची नाही तयारी मनाची,
आता नव्याने स्वतःला मी आजमावू कशाला?

तेव्हाच माझ्या भावनेला साद ना आली तुझी,
आता नव्या डोळ्यांत मी भाव ते वाचू कशाला?

जरी न झाला मनाप्रमाणे जीवनाचा सोहळा,
पुण्य माझे तोकडे अन् व्यर्थ मी भांडू कशाला?

जगू दे मला अजून थोडे क्षण सुखाचे मोजके,
मी आताच सांग शेवटाले मागणे मागू कशाला?

---------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

प्रतिसाद

आता नव्या डोळ्यात मी भाव ते वाचू कशाला?

छान आशय! सगळ्या रचनेचाच आशय छान आहे.

वृत्तास काहो सोडता मधुनीच जत्रेसारखे?
कित्तीकवेळा वृत्त ते शोधून मी आणू कशाला?

-बेफिकीर!

तंत्रशुद्ध नसलेल्या रचना   विचाराधीन ह्या विभागात हलविण्यात येतील.

आता नवे जगायाच्या उमेदी आणू कशाला?
आता नवे भोगायचे शाप मी मागु कशाला?

वा: छान!
आपण वृत्तात रचना न करताही इतका सुंदर आशय कसा काय मांडू शकता!
आणि आपली गझल लोकांच्या 'विचाराधीन' असण्याचे भाग्यही फार कमी लोकांना मिळते!

फाटकसाहेब,

एक मत 'प्रदर्शित' करावे असे वाटले. 'वृत्तात असूनही आशय सुंदर असणे' हे 'कौशल्य' असून 'वृत्तात नसूनही आशय सुंदर असणे' हे 'सहजसाध्य' असून 'वृत्तात असूनही आशय दुर्लक्षिण्याजोगा असणे' हे नियमीत आहे असे माझे मत आहे.

तिसर्‍या प्रकाराच्या 'गझला' आपल्याला याच पानावर बघायला मिळतील ही माझी शुभेच्छा!

-बेफिकीर!

सर्वच प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
सदोष रचनेबद्दल क्षमस्व.

या रचना कोण्त्याही विभागात हलविण्यास माझी कोणतीही हरकत नाही.

मी यापढे गझलेच्या तांत्रिक बाबी सांभाळण्याचा प्रयत्न करेन.

रचना सदोष असूनही मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!

याच पार्श्वभूमीवर आच रचनेचा आणखी एक शेर सुचतो, तो लिहील्याशिवाय रहावत नाही.

आता नवा दु:खास माझ्या शोधितो मी आसरा,
आसर्यासाठी फुकाचे मी कायादे पाळू कशाला?

चुभूद्याघ्या

फुकाचे मी कायदे पाळू कशाला?

भावना समजत आहेत.

कुठल्याही कवितेचा आशय कुठल्याही इतर गोष्टींपेक्षा महत्वाचा!

मात्र, गझलेत 'नियमातून' आशय खुलवण्याची मजा येते.

नुसती मजा येते असे नाही तर तसे करण्यासाठी एक तयारीपण करावी लागते.

भटसाहेबांनी हे आमच्यातुमच्यासारख्यांसाठी अत्यंत खुलासेवार सांगीतले आहे. बाराखडीचा लाभ घेता येतोच!

धन्यवाद!

अंहं बेफिकीरा..... तुला माझे म्हणणे समजलेच नाही,
वृत्तबद्ध व आशयसम्पन्न कविता करणे खरोखरीच अवघड असते
पण आपण जेव्हा कविता करत असतो तेव्हा प्रत्येक ओळ आपण मनात वाचत असतो आणि त्यापुढे दुसरी ओळ मांडत असतो.
या 'काव्यरसिक' महाशयांचे काव्य गद्य नाही प्रत्येक ओळ वेगवेगळा मीटर घेऊन आलीये.

वाचणा-याला जरी ते फारसं रोचक नसलं तरी मला असं काव्य करणं कठीण वाटतं..
तुम्ही प्रयोग करून बघा.......कदाचित ते तेवढं अवघड नसेलही
(पण पुराव्याने शाबित करून दाखवा!)