उत्तर (चुकांचा गोषवारा द्यावा)

क्षितीजावर विश्वच फाटलेले
चालताना चादर शीवतो आहे

दिपस्तंभाने फसलेले खलाशी
ओळखीचा सागर शोधतो आहे

अतर्कित न तर्क विधात्याला
स्वचुकांचा हिशोब लीहितो आहे

काजवे झुरतात दिवसाला
दिनकराची सावली पाहतो आहे

मागणे ते मागताना मागले
विनासायास पुढेच चालतो आहे

प्रश्नांचे हे वावटळ प्रत्येकाचे
जमल्यास एक उत्तर आणतो आहे

Taxonomy upgrade extras: