आसपास
(येथे मी प्रथमच लिहित आहे.
मान्य्वरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेऊन-सविनय).
सावली तुझी का झालासा मला भास
आभासावरच आहे जीव माझा तसा आसपास
शोधण्याचा तुला भरभरून झाला प्रयास
नसलेल्या अस्तित्वाचा म्हणा लागणार कसा तपास
कोण मला भिडूनी साधतो असा त्रास
येतो मनी फिरूनी एक इवलासा कयास
कळले नाही माझे सारे झाले केव्हा लंपास
जात जरी नाही मी कुणाच्या सहसा आसपास
आयुष्य सरले आसवांची न वाहता रास
का फिरूनी प्रयत्न तुझे उमटवाया ठसा आसपास?
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
बुध, 19/08/2009 - 16:59
Permalink
गझलेतली प्रत्येक ओळ एकाच
गझलेतली प्रत्येक ओळ एकाच वृत्तात हवी. वरील रचनेबाबत असे म्हणता येणार नाही. पुन्हा पुन्हा गझलेची बाराखडी वाचावी. आकलनात काही अडचण आल्यास इथेच प्रश्न विचारा.
हे लेखही वाचा.
अलका काटदरे
बुध, 19/08/2009 - 17:18
Permalink
धन्यवाद. लिहित राहिले तर
धन्यवाद. लिहित राहिले तर कदाचित आपोआपच शब्द ओघळतील असे वाटते-किंवा तशीच इच्छा आहे.
-सविनय.