जाग
जाग आजच्या जाग मराठ्या चेतव पेशीपेशी,
रायगडही आज झुंजतो अपुल्या अस्तित्वाशी..//ध्रु//
पुन्हा निधड्या छातींवरती झेला मयुरपिसे,
म्रुत्यूलाही मिरवीत दावू शौर्याची बक्षिसे...
माय मराठी द्वाही फिरवू आता देशोदेशी.....//१//
प्रसंग बाका डोमकावळे घिरट्या घाली वरती,
डाग मराठी रक्ताचेही गांधी टोपीवरती...
द्वेष मराठी खेळ खेळती दिल्लीचे दरवेशी....//२//
रोज नवी गरळ विषाची ओकती रकाने,
आपुलीच अस्मिता विकण्या काढली दुकाने..
दलाल चवथा खांब मागितो वाटणी पुरेशी....//३//
इतिहासाची पाने उलटून नेस मराठी बाणा,
शिवसूर्य प्रसविल्या मातेचा आटेल कसा पान्हा..
इथल्या दारादारांमधुनि ठाकेल उभा तानाजी.....//४//
गझल: