तेच दिवस
तेच दिवस , त्याच राति, तेच आहे जगने
ह्ळुवार होते , आता भार झाले जगने
तिचे येने तिचे जाने भेट वादळाचि
झाले उध्वस्त पुरते त्यात माझे जगने
वास्तवाशि हरलो , नशिबाला शरन गेलो
किति काळ चालणार असे भ्याड जगणे
काय काय पाहिले अन सोसले किति किति
असे दु:ख भोगले कि, पुरे झाले जगणे
विट आला आयुष्याचा , मरण वाटे चान्गले
परि आसक्त मनाचे , सुटत नाहि जगणे
गझल: