रोखुन आसवे.........

रोखुन आसवे दु:ख रेटले होते
जेव्हा हवेत महल थाटले होते

तेव्हा खरी जाग मज आली
जेव्हा माझे स्वप्न तुटले होते

चुकिचेच ठरावेत का ?अंदाज सारे,
जेव्हा मज बरोबर वाटले होते

तेव्हा न मिळाली साथ कोणाची
जेव्हा नशिब माझे  फाटले होते

                                                          _गौतम.रा.खंडागळे.