श्रीरंगा......
स्मशाणात पडले उताने
प्रेतावर प्रेत रचले श्रीरंगा
विस्पोट येथे क्षणात तेथे
भोग हे कसले श्रीरंगा
चितडे चितडे चिंद्या चिंद्या
निष्पाप रक्त सांडले श्रीरंगा
पाषाणाचा जरी असला
तुझाच ओथंबारे श्रीरंगा
तरफडत पेटले द्रुष्य तरिही
डोळे बंद कारे श्रीरंगा
तोड श्रुंखला देव पनाच्या
द्रुत घे जन्म तू आतारे श्रीरंगा
बघ सारेच कसे द्वाड आणि दंभी
जन्म तुझा हर युगातरे श्रीरंगा
कलयुगात पाहतोस वाट कसली
द्रुत घे जन्म तू आतारे श्रीरंगा
उघड बंद डोळे आता
काड हात कमरे वरचा , पुरे श्रीरंगा
सोडती वांझ वीट अन्
द्रुत घे जन्म आता तूरे श्रीरंगा
गौतम्.रा.खंडागळे
गझल: