वसंता...........

अतूरतेने वाट पाहतो 
धरतिवर येरे वसंता

अंगणात माज्या बरसुन
गंध मातिचा देरे वसंता

 आठवणी गार्‍यात घेउन
झर झर तू येरे वसंता

काळ्या मातिवर बरसुन
  शहारुन तू जारे वसंता

निळ्या आकाशी झेप घेउन
सप्तरंग तू देरे वसंता

अजुनी आहे एकटाच मी
घेउन तिला येरे  वसंता
घेउन तिला येरे  वसंतता ......                                         _गौतम.रा.खंडागळे.

प्रतिसाद

संपूर्ण गझल एकाच वृत्तात असायला हवी. ह्या रचनेबाबत असे म्हणता येणार नाही. पुन्हापुन्हा बाराखडी वाचावी. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तात गझल लिहिली
जाते. वृत्तांचा अभ्यास करावा. लघू आणि गुरू म्हणजे काय, ह्याचा अभ्यास
करावा.  अक्षरगण कसे पडतात किंवा मात्रा कशा मोजतात, हे देखील समजून
घ्यावे.  यमक (काफिया), अन्त्ययमक (रदीफ) आणि अलामत आदींचा अभ्यास करावा. किमान एवढ्या गोष्टी गझल लिहू इच्छिणार्‍याला शिकणे, आत्मसात करणे आवश्यक आहे.