सौदा
वचनाला ज्या मी फसलो तो पोकळ वादा होता,
अन प्रेम समजलो ज्याला तिजसाठी सौदा होता.
तिज नामाच्या स्मरणाने गंधाळे माझा श्वास,
बदनाम मला करण्याचा पण तिचा इरादा होता.
मी फकीर झालो इकडे सोडुनिया सारी लाज,
पण प्रेमाआधी तीस्तव व्यवहार कायदा होता.
ती ठोकरुनी मज जाता मी दोष कुणाला देवू?
कुणि दुसर्याच्या बाहूंत जर तिचा फायदा होता.
मी आक्रंदतो कधीचा पण ओळखले तू नाही,
भरजरत्या वस्त्रांतुनही संन्याशीच साधा होता.
गझल:
प्रतिसाद
शांडिल्य
मंगळ, 21/04/2009 - 00:39
Permalink
???
नो कॉमेन्ट्स?