रीत माझी... (हझल)
'मी तुझ्यावाचून जगणे टाळतो'
अन् असे येईल तिजला सांगतो
या जगाशी 'शेर' होवुन भांडतो...
वाट घरची 'म्यॉंव' करुनी पकडतो
आयकरची धाड पडता दफ्तरी...
मी 'तयांचे' पोट पहिले फाडतो
कोण म्हणते 'सांग तू हे समजुनी'
समजण्या गुडघ्यांस चापट मारतो
मिटुन डोळे दूध मीही प्यायचो
आज ते मी या जगाला शिकवतो
'पाहुनी मजला जगाची फाटते...'
स्वप्न पाहुन रोज चादर फाडतो
एक डोळा पाहता उघडा म्हणे,
'ना रुपाया.. आठ आणे मागतो.'
सारखे येती 'किनारी' शिकविण्या
पेडगावीं रोज 'तांब्या' लावतो
रीत माझी ऐकुनी रागावतो
बंद ओठाने तरीही हासतो
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 02/02/2009 - 22:12
Permalink
बंद ओठाने तरीही हासतो
हा नेहमीचाच अनुभव!
सुंदर हझल!
प्रत्येक शेर अर्थपूर्ण अन चांगला.
हझल ही गझलेच्या तंत्रातली एक अशी रचना असते ज्याच्यात हास्य हे सामाजिक विडंबनाबरोबर गुंफून येते. माझी स्वतःची हझल ' हझल वाचा, हझल' ही तशी नव्हती अन आपलीही तितकीशी तशी वाटत नाही.
मित्रत्वाने सांगणे - सामाजिक विषय हझलेत घेणे किंवा प्रेम हा विषय हझलेत घेणे सुयोग्य!
बाकी आपले विचार आवडले.
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
सोम, 02/02/2009 - 22:26
Permalink
मान्य
बसस्टॉपवर एका मुलीला फोनवर बोलताना पाहून पहिल्या दोन ओळी सुचल्या. पुढे त्याचीच री ओढली.
कलोअ चूभूद्याघ्या