हझल वाचा, हझल !
काम उरकले दुपार झाली काय बरे करुया आता?
वडीलकीच्या नात्याने बडबडगीते रचुया आता
सरपटणारा काऊ पाहुन माकड झटके पंखांना
उंदिर पाहुन माऊ बिचके काहीही म्हणुया आता
महिलामंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे
गझल राहिली बाजूला मारामारी बघुया आता
रस्ता ओलांडाया केले सहाय्य कोणी अंधाला
अंध म्हणे चल तुलाहि नेतो हसुया की रडुया आता?
लहान बाळे स्वप्नामध्ये मल्लीकाशी खेळ करी
पालक चोखी अंगठ्यास रे इथे कसे जगुया आता?
नवीन रंगाने रंगवला शेर नवा, अन आले वर
भांडवलाची कमतरता नूतनीकरण करुया आता
धन्यवाद सर्वांना देणे महिन्याने का सुचते रे?
इतरांना आठवून अपले स्मरण त्यांस करुया आता?
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
शुक्र, 30/01/2009 - 16:39
Permalink
भूषण...प्रय
भूषण...प्रयत्न बरा आहे...
पण भज्जी पडयला लागलीत ...
जुळ्वा जुळव वाट्ते...परखड....
काम उरकले दुपार झाली काय बरे करुया आता?
वडीलकीच्या नात्याने बडबडगीते रचुया आता
सरपटणारा काऊ पाहुन माकड झटके पंखांना
उंदिर पाहुन माऊ बिचके काहीही म्हणुया आता
महिलामंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे
गझल राहिली बाजूला मारामारी बघुया आता
अजय अनंत जोशी
शुक्र, 30/01/2009 - 17:19
Permalink
स्मरण
इतरांना आठवून अपले स्मरण त्यांस करुया आता? अपुले हवे होते का?
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
शुक्र, 30/01/2009 - 20:44
Permalink
हा..हा..
काही संदर्भ लागले, काही लागले नाहीत.
हा शेर-
महिलामंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे
गझल राहिली बाजूला मारामारी बघुया आता...
भूषणजी.. काळजी घ्या स्वत:ची. :)
भूषण कटककर
शनि, 31/01/2009 - 06:45
Permalink
उफ्फ!
दशरथजी - बरा प्रयत्न वाटल्याबद्दल धन्यवाद! यापुढे आपल्याला जास्त आवडेल असे देण्याचा प्रयत्न करीन. 'भजी पडत आहेत' हा परखडपणा अतिशय आवडला. ( हे सर्व लिहिताना आपल्याला माझी 'हझल' व त्यातील 'मुद्दे अन संदर्भ' कळले आहेत असे मी गृहीत धरत आहे. )
अजय - प्रश्न 'अपुले' की 'अपले' हा महत्वाचा नाही, शब्दरचनेत थोडा बदल करून मी 'आपले' हा शब्दही बसवू शकलो असतो. प्रश्न आहे की मनस्थिती सतत 'कवी'सारखी ठेवणे महत्वाचे ठरावे. मी ती ठेवायचा 'प्रयत्न' करत असतो. कधी स्वत;ची दु:खे. कधी कशावर टीका, कधी विनोद, कधी स्वतःवर टीका अशा सर्व गोष्टी सतत कवितेतून येत रहाव्यात असे मला वाटते. आठवडा आठवडाभर प्रचंड विचार करून गझल केली की जास्त दर्जेदार किंवा तंत्रशुद्ध गझल होते या विचाराला मी सरळ सरळ छेद देतो. ( आपण असे म्हणता असे म्हणत नाहीये, या हझलेच्या अनुषंगाने लिहीत आहे ). उत्स्फुर्तपणे जे सुचते तेही सुंदर व 'जान' असलेले असू शकते. ( माझे असेलच असे नाही..... हा हा हा ).
ज्ञानेश - धन्यवाद! एखादा संदर्भ लागला नसेल तर निरोपातून निश्चीत सांगेन. आणि खरय तुमचे, काळजी घ्यायलाच पाहिजे. जो टीका करतो त्याची टीका सहन करायची पण तयारी असायलाच पाहिजे. माझी आहे. आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद! मला आपल्या गझला अन प्रतिसाद दोन्ही मनापासून आवडतात, कारण त्यातून आपले मिश्कील आणि परिपक्व असे व्यक्तिमत्व दिसते.
तिलकधारी
शनि, 31/01/2009 - 09:31
Permalink
हझल
अंध हा शेर हसण्यासारखा आहे.
चांदणी लाड.
शनि, 31/01/2009 - 10:16
Permalink
समजुत येत आहे:)
मतला वाचुन हसू येते.
संदर्भ लक्षात आलेच..(म्हणजे बहुदा मलाही गझल-हझल बाबत समजुत येत आहे:)
भूषण काका, शेरास सव्वाशेर भेटतोच. महिलामंडळ घुसले आहे तेव्हा सावध रहा..!! :):)
मीर क्षीरसागर
शनि, 31/01/2009 - 10:43
Permalink
अंध,महिला,बाळे,पालक,धन्यवाद,भांडवल सारे काही छानच्च !
काम उरकले दुपार झाली काय बरे करुया आता?
वडीलकीच्या नात्याने बडबडगीते रचुया आता
सरपटणारा काऊ पाहुन माकड झटके पंखांना
उंदिर पाहुन माऊ बिचके काहीही म्हणुया आता
महिलामंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे
गझल राहिली बाजूला मारामारी बघुया आता
रस्ता ओलांडाया केले सहाय्य कोणी अंधाला
अंध म्हणे चल तुलाहि नेतो हसुया की रडुया आता?
लहान बाळे स्वप्नामध्ये मल्लीकाशी खेळ करी
पालक चोखी अंगठ्यास रे इथे कसे जगुया आता?
नवीन रंगाने रंगवला शेर नवा, अन आले वर
भांडवलाची कमतरता नूतनीकरण करुया आता
धन्यवाद सर्वांना देणे महिन्याने का सुचते रे?
इतरांना आठवून अपले स्मरण त्यांस करुया आता?
खूपच आवडली हो हझल! आगे बढो!