आह को चहिये एक उम्र असर होने तक - अर्थ हवा आहे

सुशिल(not verified)  यांनी उपस्थित केलेला प्रश्न.

गालिब??

आह को चहिये एक उम्र असर होने तक
कौन जिता है तेरे जुल्फ के सर होने तक

अर्थ?

गझलचर्चा: 

प्रतिसाद

एका साध्या निश्वासाला प्रतिसाद मिळण्यात संपूर्ण आयुष्य जिथे जाते तिथे तू कसली माझी होणार? मी असेन थोडाच त्यावेळी?

समीक्षकजी, आपण फार सुंदर भावार्थ सांगितलात, अगदी १-२ वाक्यांत!
"जुल्फ के सर" हे शब्द या शेराचं सौंदर्य आहे!!

"जुल्फ के सर" हे शब्द या शेराचं सौंदर्य आहे!!
दुस-या ओळीतील अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने देता येतो.
१. कोण जिवंत राहू शकेल तू मिळेपर्यंत?
२. इथे कोणाला एवढे थांबायचे आहे कि तुझी वाट पहावी?
३. तू माझी होईपर्यंत मीच या जगात नसेन.
४. कोण जिवंत राहील तू प्राप्त होण्याजोगी होईपर्यंत..
५. इतका काळ कोण थांबेल? आम्ही तर तुला पाहून आत्ताच मेलो आहोत.
तसेच पहिल्या ओळीतूनही वेगळे अर्थ निघू शकतात.
१. गंभीर समीक्षकाप्रमाणे (विधानात्मक).
२. एका छोट्या परिणामासाठी अख्खे आयुष्य जात असते! (उद्गारवाचक)
३. (तू मोठी होईपर्यंत कोण राहणार आहे...) मला तर फक्त क्षणभराचे आयुष्य पाहिजे आहे.
४. तू मिळेपर्यंत थांबायचे कशाला? कारण, परीणाम होईपर्यंतच कारणाचे महत्व असते.  तुला नुसते पाहूनच मी खल्लास झालो.
असो.
मी फारसा बोलत नाही.

हे पहा बाकीचे शेर. याला म्हणतात गझल. गालीबने या गझलेत नुसती अफलातून धमाल केली आहे. कल्पना करवत नाही की त्यावेळेला उपस्थित शायरांनी किती दाद दिली असेल. त्यावेळचे प्रेम कसे असायचे हे डोळ्यासमोर उभे राहते.
दाम हर मौजमे है हल्का-ए-सद्-काम्-ए-नहंग
देखे क्या गुजरे है कतरे पे गौहर होने तक
( प्रत्येक लाटेबरोबर शेकडो जाळी - पकडण्यासाठी असलेली जाळी - येतात. बघुया शिंपल्याचा मोती होइपर्यंत काय काय होते. )
आशिकी सब्र-तलब और तमन्न बेताब
दिल का क्या रंग करूं खुन-ए-जिगर होने तक
( प्रेमात संयम पाळावा लागतो अन इकडे आम्ही तर स्वतःला आवरूच शकत नाही आहोत. हृदयातून रक्त वाहीपर्यंत - मरेपर्यंत - हृदयाचे काय काय रंग होणार कोण जाणे )
हमने माना के तगाफुल ना करोगे लेकिन
खाक होजायेंगे हम तुमको खबर होने तक
( मान्य प्रिये, की तू अगदीच काही आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीस. पण तुझ्यापर्यंत बातमी येईस्तोवर आम्ही संपलेलो असू किंवा तुझ्या मनात आमच्याबद्दल काही येईस्तोवर आम्ही संपलेलो असू )
पर्तव-ए-खूरसे है शबनम को फना की तालिम
मैभी हूं एक इनायत की नझर होने तक
( सूर्याची किरणे आली की दवाचे अस्तित्व संपते. माझ्यावरही तिची एक उपकारपुर्वक नजर पडली की मी मरणार )
गम-ए-हस्ती का 'असद' किससे हो जुझमर्ग इलाज
शम्मा हर रंगमे जलती है सहर होने तक
( रे गालिब, तुझी दु:ख संपण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुझा मृत्यू! सकाळचा उजेड मिळेस्तोवर ज्योत कसे का असेना पण जळतच राहते की नाही? )

 

हा आणखी एक शेर आहे....
यक नझर बेश नही फुरसते-हस्ती गाफिल
गर्मि-ए-बझ्म है इक रक्स्-ए-शरर होने तक
वीज चमकावी अन बघेपर्यंत तिचा तो प्रकाश नाहीसा सुद्धा व्हावा इतकेच अल्पजीवी जीवन सुद्धा आहे.

क्या बात है.. धन्यवाद......
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

पर्तव-ए-खूरसे है शबनम को फना की तालिम
मैभी हूं एक इनायत की नझर होने तक
( सूर्याची किरणे आली की दवाचे अस्तित्व संपते. माझ्यावरही तिची एक उपकारपुर्वक नजर पडली की मी मरणार )
गझलेत / कवितेत /साध्या शब्दांतही जेवढा विचार करू तेवढ्या अर्थच्छटा निघतात. मला असेही वाटते....
...माझे आयुष्यच तेवढ्यासाठी (तिची 'ती' नजर मजवर पडावी / मजकडे तिने पहावे ) ! नाही तर मी जगतोय एरवी नाहीतरी कशासाठी...?). यात आयुष्याच्या ठरवलेल्या ध्येयासह / सार्थकतेसह (क्षण)भंगुरत्वाबद्दलही गालिब किती खुबीने सांगून जातात... क्या बात है..
चर्चेबद्दल धन्यवाद...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

असे बोलत रहावे... हे किती छान आहे.. आस्वादक, आश्वासक आणि आल्हादकही... क्या बात है...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

नहंग म्हणजे मगर्...पावसाच्या थेंबाचा मोती होईतो त्यावर काय काय संकटे येतील्..कारण पाण्याच्या प्रत्येक लाटेत शंभर मगरींच्या जबड्याएवढी शक्ती आहे...

थेंबाचा मोतो होणे एका उच्च्च प्रक्रियेचे द्योतक आहे...माणसाला आपले ध्येय मिळ्ण्यापुर्वी किती संकटांचा सामना करावा लागतो, असा भावार्थ..

मीर चा हा शेर पहा,

जुज मर्तबयेकुल को हासिल करे है आखिर
एक कतरा नहीं देखा के जो दरिया न हुआ ..

अंश ( जुज) एक दिवस पुर्णत्वास जातोच्...असा एकही थेंब आम्ही पाहिलेला नाही , जो स्वतःच सागर झालेला नाही !!!!

एक कतरा नहीं देखा के जो दरिया न हुआ ..
क्या बात है!! याला म्हणावा मिसरा आणि याला म्हणावा शेर!!!

एका शेराचा अर्थ शोधण्यावरून जी काही गंमत इथे झाली ती वाचल्यानंतर सुरेश भटांबद्दल आणखीनच आदर वाटायला लागला. या वेबसाईटची प्रेरणा अखेर तेच आहेत. एवढ्या चर्चेने ज्ञान तर वाढलेच पण मस्त मझा आला. धन्यवाद!

सुन्दर्....शेर छान
आवडले................
 
आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
संपले सारे पुराणे त्रास पहिल्यासारखे


आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे


दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे