कैफियत-१
आज मी "एल्गार" हा माझा तिसरा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या हवाली करीत आहे. हा काव्यसंग्रह मराठी रसिकांच्या सुपूर्द करून मी एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालेलो आहे. ह्या महागाईच्या दिवसांत स्वत:च कवी आणि प्रकाशक असल्यावर माणसाला किती कटकटी आणि आर्थिक विवंचनांना तोंड द्यावे लागते, हे ज्याचे त्यालाच ठाऊक.
या माझ्या "एल्गार" काव्यसंग्रहात काही मोजके अपवाद सोडून बहुतेक सर्व गझलाच आहेत. मला अत्यंत आवडलेल्या माझ्या "एल्गार" ह्या गझलेचे नाव मी ह्या काव्यसंग्रहाला दिलेले आहे. मी ती गझल लिहिली तेव्हाच मी ह्या काव्यसंग्रहाचा नामकरणविधी उरकून टाकला.
मराठीत "एल्गार" ह्या शब्दाचा अर्थ "जोराचा हल्ला" असा होतो. हा शब्द मूळ तुर्की आहे. तुर्कीत "यल्गार" म्हणतात.
मराठी गझलेचा विचार करताना उर्दू भाषेतील "नजाकत" मराठीत येऊच शकत नाही, असे म्हणणारे काही लोक आढळतात. आणि फार तर देवनागरी लिपीपुरताच उर्दू काव्याशी संबंध असलेले अनेक महाभाग मराठी गझलेला उर्दू गझलेची भ्रष्ट नक्कल म्हणतात. माझा हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर हा आरोप कितपत खरा आहे, हे मराठी रसिकांनीच ठरवावे.
वास्तविक मराठी भाषेला नजकतीची गरजच नाही. ज्यावेळी उर्दूचा जन्मही झालेला नव्हता, यावेळी मराठीत "आज मी "एल्गार" हा माझा तिसरा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या हवाली करीत आहे. हा काव्यसंग्रह मराठी रसिकांच्या सुपूर्द करून मी एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालेलो आहे. ह्या महागाईच्या दिवसांत स्वत:च कवी आणि प्रकाशक असल्यावर माणसाला किती कटकटी आणि आर्थिक विवंचनांना तोंड द्यावे लागते, हे ज्याचे त्यालाच ठाऊक.
या माझ्या "एल्गार" काव्यसंग्रहात काही मोजके अपवाद सोडून बहुतेक सर्व गझलाच आहेत. मला अत्यंत आवडलेल्या माझ्या "एल्गार" ह्या गझलेचे नाव मी ह्या काव्यसंग्रहाला दिलेले आहे. मी ती गझल लिहिली तेव्हाच मी ह्या काव्यसंग्रहाचा नामकरणविधी उरकून टाकला.
मराठीत "एल्गार" ह्या शब्दाचा अर्थ "जोराचा हल्ला" असा होतो. हा शब्द् मूळ तुर्की आहे. तुर्कीत "यल्गार" म्हणतात.
मराठी गझलेचा विचार करताना उर्दू भाषेतील "नजाकत" मराठीत येऊच शकत नाही, असे म्हणणारे काही लोक आढळतात. आणि फार तर देवनागरी लिपीपुरताच उर्दू काव्याशी संबंध असलेले अनेक महाभाग मराठी गझलेला उर्दू गझलेची भ्रष्ट नक्कल म्हणतात. माझा हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर हा आरोप कितपत खरा आहे, हे मराठी रसिकांनीच ठरवावे.
वास्तविक मराठी भाषेला नजकतीची गरजच नाही. ज्यावेळी उर्दूचा जन्मही झालेला नव्हता, यावेळी मराठीत "ज्ञानेश्वरीने" आणि "अमृतानुभव" ह्यासारखे ग्रंथ लिहिले गेले. उर्दूच कशाला, जगातील कोणत्याही भाषेत मराठी भाषेला "नजाकत" देण्याचे सामर्थ्य नाही. आपल्याच मायबोलीचे सामर्थ्य आम्हाला ठाऊक नसते. हे आमचेच करंटेपण आहे. वाचायला किंवा ऐकायला लुसलुशीत वाटणारा शब्द वापरण्याची एक शब्दखोर सवय आम्हाला जडलेली आहे, म्हणून आम्ही मराठी भाषा वळवू शकत नाही. जे सांगायचे आहे ते आणि तेवढेच नेमके सांगू शकत नाही. आणि मग एकमेकांच्या पाठी थोपटणे किंवा थोपटवून घेण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकत नाही.
पण कवीपेक्षाही सामान्य मराठी माणसाची भाषा अधिक समृद्ध असते. मानवी संवेदनांमुळे होणारी त्याची प्रतिक्रिया अधिक तीव्र, सहज व प्रामाणिक असते. त्याची शब्दांची जाण अधिक, सूक्ष्म व प्रखर असते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मी हे अनुभवले आहे की, आपल्या भावना, संवेदना आणि सुखदुःखे मराठीसारख्या मराठी भाषेत नेमक्या अचूक प्रभावी शब्दांत बोलून दाखविणाऱ्या कवीचे मराठी माणसे नेहमीच स्वागत करतात.
गझलेचा विचार करताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्याप्रमाणे मोटारकारची यंत्ररचना कोणत्याही देशाच्या मालकीची नसते, त्याचप्रमाणे गझल हा काव्यप्रकार कोणत्याही भाषेच्या मालकीचा नाही. गझल अरबीतून फारसीत आली. फारसी भाषिक इराण्यांनी खऱ्या अर्थाने तिचा विकास केला, आणि मग सुमारे चारशे वर्षांपूर्वी बाल्यावस्थेतील उर्दू भाषेत फारसीतून गझल आली.
आज तुर्की, पंजाबी, सिंधी, पश्तो, हिंदी आणि हिंदीच्याच बोलभाषा असलेल्या अवधी, व्रज, भोजपुरी इत्यादींत गझला लिहिल्या जात आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून गुजरातीत गझल एकजीव झालेली आहे आणि आता महाराष्ट्रानेही उशिरा का होईना, पण गझलेचा स्वीकार केलेला आहे.