विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

झेप

फुलांकडे रंग थोडे मागायचे राहीले.
उधळून उरीचा गंध थोडा जगायचे राहीले.


सवाल नजरेने केलास अन् डोळ्यांत पाणी दाटले,
मौनाचे काही 'अटी-कायदे' पाळायचे राहीले.


कालच्या धुंद रात्री तुझी चाहूल ज्यांना लागली,
अर्थ त्या स्वप्नांचे तेवढे कळायचे राहीले.


एक हाक ऐकून माझी,अडखळले पाऊल जरी,
सांग 'मागे' तेव्हा तुझे का वळायचे राहीले ?


उजेडास भाळूनि घेतली दिव्यावरती झेप मी,
पंख जळाले फक्त अन् प्राण जायचे राहीले !  

Taxonomy upgrade extras: 

नको रातराणी नको पारीजात

नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात.
जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात.
 
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
 
जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर.
उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
 
तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला.
जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात. 

Taxonomy upgrade extras: 

Pages