'एका शहराच्या खुंटीवर'च्या निमित्ताने परिसंवाद




कवी आणि गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका शहराच्या खुंटीवर या गझलसंग्रहाच्या निमित्ताने येत्या २१ डिसेंबर रोजी  सुरेश भट आणि नंतरची मराठी गझल
हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ह्या विषयावर डॉ. द. भि. कुलकर्णी,
डॉ.अरुणोदय भाटकर आणि स्वतः कवी चंद्रशेखर सानेकर आपली मते मांडतील. कवी
अरुण म्हात्रे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

सानेकर यांचा हा दुसरा गझलसंग्रह. एका उन्हाची कैफियत हा त्यांचा गझलसंग्रह प्रकाशित झालेला आहे. दोन्ही गझलसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केलेले आहेत.रोखठोक आणि परखड शैलीबद्दल सानेकर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गझलांमध्ये पारदर्शकता आणि तरलता हे गुण प्रामुख्याने आढळतात. एका उन्हाची कैफियत गझल रसिकांनी चांगले स्वागत केले होते. याही संग्रहाचे गझलरसिक जोरदार स्वागत करतील ह्यात शंका नाही.

दादर सार्वजनिक वाचनालय ह्या संस्थेच्या वतीने संस्थेच्याच धुरू सभागृहात होणाऱ्या ह्या परिसंवादात डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ.अरुणोदय भाटकर आणि स्वतः कवी चंद्रशेखर सानेकर आपली मते मांडतील. कवी अरुण म्हात्रे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

सानेकर यांच्या या गझलसंग्रहाचे आम्ही उत्स्फूर्त स्वागत करतो. त्यांच्या पुढील गझललेखनाला आमच्या मनापासून शुभेच्छा !



तारीख : शुक्रवार, २१ डिसेंबर २००७
स्थान : दादर सार्वजनिक वाचनालयाचे धुरू सभागृह
वेळ : संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटे.




प्रतिसाद


प्रिय चंद्रशेखर सानेकर ,
आपल्या
एका शहराच्या खुंटीवर     या गझलसंग्रहाचे प्रकाशन.
मनःपूर्वक अभिनंदन.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत

प्रिय चंद्रशेखर सानेकर ,
आपल्या
 एका शहराच्या खुंटीवर या गझलसंग्रहाचे प्रकाशन येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. आपले
मनःपूर्वक अभिनंदन.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत

[quote=विश्वस्त]





कवी आणि गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या एका शहराच्या खुंटीवर या गझलसंग्रहाचे प्रकाशन येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. सानेकर यांचा हा दुसरा गझलसंग्रह. एका उन्हाची कैफियत हा त्यांचा गझलसंग्रह प्रकाशित झालेला आहे. दोन्ही गझलसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केलेले आहेत.

रोखठोक आणि परखड शैलीबद्दल सानेकर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गझलांमध्ये पारदर्शकता आणि तरलता हे गुण प्रामुख्याने आढळतात. एका उन्हाची कैफियत गझल रसिकांनी चांगले स्वागत केले होते. याही संग्रहाचे गझलरसिक जोरदार स्वागत करतील ह्यात शंका नाही.

दादर सार्वजनिक वाचनालय ह्या संस्थेच्या वतीने संस्थेच्याच धुरू सभागृहात होणाऱ्या ह्या प्रकाशनसोहळ्यात प्रसिद्ध समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. अरुणोदय भाटकर आणि प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सहभागी होणार आहेत.

ह्या गझलसंग्रहाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून मराठी गझल : निमित्त 'एका शहराच्या खुंटीवर' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ह्या विषयावर डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ.अरुणोदय भाटकर आणि स्वतः कवी चंद्रशेखर सानेकर आपली मते मांडतील. कवी अरुण म्हात्रे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

सानेकर यांच्या या गझलसंग्रहाचे आम्ही उत्स्फूर्त स्वागत करतो. त्यांच्या पुढील गझललेखनाला आमच्या मनापासून शुभेच्छा !



तारीख : शुक्रवार, २१ डिसेंबर २००७
स्थान : दादर सार्वजनिक वाचनालयाचे धुरू सभागृह
वेळ : संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटे.





[/quote]
पहिल्या रांगेत बसुन तुम्हाला एकण्याची एक संधी जाणार तर ?  हरकत नाही .. मनाने आम्ही तिथेच असणार.. आमच्या शुभेच्छा आहेतच..
महेंद्र राजगुडे