"दारू"

कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ जाण्याची
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो

--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

मेण जळावे.. आणि सुगंध येतो जखमांना... हे शेर आवडले. मेण जळावे हे चित्रदर्शी शेर आहे.

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

चांगला शेर !

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो
छानच. त्यानंतरचाही छान. एकंदर पारंपरिक कल्पना आहेत. 'तिकडे' वगैरे काही फारसे अपील होत नाही. अर्थात अशा शेरांना दाद मिळते.

'तिकडे' वगैरे काही फारसे अपील होत नाही. अर्थात अशा शेरांना दाद मिळते.>>>>>

सहमत आहे :)

वाह !
आवडली.

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

vaa vaa!